उत्तरापथ

तक्षशिला से मगध तक यात्रा एक संकल्प की . . .

जीवनाचे उद्दिष्ट काय?


GWALIOR-1 copy१९८५ मध्ये भारत सरकारने विचार केला की, पूर्ण देशात एक दिवस तरूणांकरिता असावा. जसा महिला दिन, बाल दिवस तसाच युवा दिवस. शोधाशोध सुरू झाली की कुठल्या सणा-दिवसाला हे बिरूद प्रदान करावं? योजना आयोगाच्या बैठकीत अनेक नेते आणि महापुरुष यांच्या नावाचे सल्ले देण्यात आले. शेवटी एकमत झालं ते स्वामी विवेकानंद जयंतीवर. तेव्हापासून १२ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिवस’ पूर्ण देशात साजरा केला जाऊ लागला. शासकीय कामातही कधी कधी चांगले निर्णय होऊ शकतात याचेच हे उदाहरण. स्वामी विवेकानन्द हे युवकांचे आदर्श आहेत. त्यांनी स्वत: केवळ ३९ वर्षाच्या जीवनात जगभरात अलौकीक काम केले. त्यांच्या वैचारिक अग्निमंत्रांनी युवकांना गेल्या पूर्ण शतकात प्रेरित केलय. स्वामीजींच जीवन आणि विचार दोन्ही युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

आजच्या तरूणांप्रमाणेच किशोर वयात नरेन्द्रनाथच्या मनात अनेक प्रश्‍न होते. जे सांगितले जात होते त्यावर प्रश्‍न न विचारता विश्‍वास ठेवण्याची त्यांची वृत्ति नव्हती. पण फक्त शंकेने प्रश्‍न विचारण्यापुरता अविश्‍वास अशी स्थिती नव्हती तर सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा होती. म्हणून प्रश्‍नांचा तार्किक पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी होती. वेळ पडल्यास प्रयोग करण्याचे धाडसही होते. आमराईच्या चौकीदाराने झाडावरच्या ब्रह्मसमंधाची भीती दाखवली तर लहान बालक नरेन्द्र रात्रभर झाडावर चढून बसला; पाहूया कसा दिसतो ब्रहमराक्षस ते? एकदा कीर्तनकाराने सांगितले की, चिरंजीव मारूति केळीच्या बागेत राहतो तर हा १०-१२ वर्षाचा पट्ठा जाउन बसला केळीच्या बागेत वायुपुत्राला भेटायला! असा हा नरेंद्र.

जिज्ञासा तर विकासाचा पाया पण ही जिज्ञासा श्रध्देच्या पाठबळावर असेल तर ज्ञानात परिणित होते. अन्यथा आस्थाहीन शंकेखोरपणा शेवटी हताशेत आणि परिणामी मानसिक विषण्णेतच बहुदा संपतो. आजच्या शिक्षणात तरूणाला प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त तर केले जाते पण पूर्ण पाठपुरावा करून धैर्यानिशी (निष्कर्शापर्यन्त) अंतिम सत्यापर्यन्त पोहचण्याची प्रगल्भता त्याला प्राप्त होत नाही. असल्या अर्धवटपणामुळेच आजचा युवक मनाने इतका कमकुवत झालेला दिसतो की थोडयाश्या अपयशानेही तो खचून जातो. नैराश्य आणि प्रसंगी अगदी आत्महत्येपर्यंत टोकाची स्थिती जाण्याच्या घटनांमध्ये वाढच होतांना दिसते आहे. मनाची खंबीरता वाढवायची असेल तर आजच्या युवकांनी स्वामी विवेकानन्दाच्या चरित्राचा अभ्यास करायला हवा.

सामान्य उत्सकुकतेला जिज्ञासेत व जिज्ञासेला ज्ञानपिपासेत परिपक्व करण्याचे तन्त्रज्ञान स्वामी विवेकानन्दांच्या Questionmarkकिशोरावस्थेतून युवावस्थेपर्यन्तच्या जीवनातून शिकायला मिळते. लोक देव, देव इतकं करतात ते नेमकं काय असतं? खरोखर ईश्‍वर नावाची कुठली सर्वशक्तीमान, सर्वव्यापक, सत्ता मुळात आहे तरी का? असली उत्सुकता आणि कुतुहल तर प्रत्येकाच्याच मनात येत. पण असे किती युवक असतील जे ह्या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी गांभिर्याने प्रयत्न करतात?

नरेन्द्राचे फक्त उत्सुकतेवर भागणार नव्हते. त्याने यासाठी तीन्ही शास्त्रोक्त उपायांचा अभ्यास केला. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. विभिन्न तत्वज्ञानांचा अभ्यास केला. ब्राह्‌मो समाजात जाऊ लागला. अनुभवी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवून त्यांनी सांगितलेल्या उपायांवर स्वत: प्रयोग केले. अनेक तास ध्यान लावण्याचा सराव केला. अशाप्रकारे शास्त्र-स्वाध्याय, आप्त-वाक्य श्रवण व स्वत: प्रत्यक्ष प्रयोग या तीन्ही उपायांनी नरेन्द्रची जिज्ञासा परिपक्व ज्ञानपिपासेत रूपांतरित झाली.

या ज्ञान पिपासेतूनच त्यांना गुरू भेटले. श्रीरामकृष्ण परमहंसाबद्दल त्यांनी स्वत:चे मामा श्री. रामचन्द्र दत्त यांचेकडून ऐकले. त्यांचा मित्र सुरेन्द्रनाथ दत्तच्या घरी श्रीरामकृष्णांसमोर गायनाचा प्रसंगही आला. इंग्रजीच्या प्राध्यापकांनी पण वर्डस्वर्थची कविता शिकवतांना समाधीच्या उदाहरणाकरिता श्रीरामकृष्णांचा उल्लेख केला. मामांबरोबर नरेन्द्र दक्षिणेश्‍वरला गेले. प्रथम भेटीत श्रीरामकृष्णांच्या वागण्यावर त्यांना शंकाच आली. पण परिपक्व ज्ञानपिपासेने शंकेच्या धुक्यातून परिक्षेचा कंदिल धरण्याची प्ररेणा दिली. या गुरू शिष्य सम्बधातून नरेन्द्राच्या जीवनात श्रध्देचा उदय झाला. (याबाबत पुढे पाहू. तुर्तास यौवनाचा पहिला अनविार्य गुण जिज्ञासा याचा विचार.)

शंका, कुतुहल, उत्सुकतेतून उलगडणारी मानवसुलभ जिज्ञासा, स्वाध्याय, श्रवण आणि प्रयोगाच्या मुशीतून तावून निघते तेव्हाच तिचे ज्ञानपिपासेत संस्करण होते. या सगळयाचा प्रारम्भ होतो पण त्यासाठी प्रश्‍न विचारायला हवेत. ज्ञानी जनांना तर प्रश्‍न विचारायचेच पण त्याहून महत्वाचे आहे स्वत:ला प्रश्‍न विचारणे. स्वामी विवेकानन्द सांगतात जो प्रश्‍न आपण इतरांना विचारतो तो प्रथमत: स्वत:ला विचाराल की नाही? चला आजच सुरूवात करूया. जो प्रश्‍न स्वामीजी प्रत्येक युवकाला विचारायचे तोच आज आपण स्वत:ला विचारूया. या माझ्या जीवनाचे उद्दिष्ट काय?

ईश्‍वर साक्षात्काराची जिज्ञासा नसली तरी चालेल. पण स्वत:च्या जीवनाचे काय करायचे ते तर ठरवायलाच हवे ना? प्रत्येकाचे जीवन अद्वितीय आहे. विशिष्ट उद्देश्याने, विशिष्ट कार्यासाठी प्रत्येकाचा जन्म झाला आहे. त्याचा शोध घेणे ही प्रत्येकाची पहिली जिज्ञासा असायला हवी. पण आपण याच महत्वाच्या प्रश्‍नाला टाळत असतो. काय बनायचे याचा विचार करण्याआधी हा विचार करायला हवा की मी कोण? कशासाठी माझा हा जन्म झाला ? काय माझ काम आहे? चला या प्रश्‍नांवर विचार करूया. पुढल्या आठवडयात श्रध्दा जागरणाने या स्वकर्तव्यास कसे तडीस न्यायचे ते पाहुया.

जनवरी 31, 2013 Posted by | Marathi Lekh | , , , , , , , , , , , , , | टिप्पणी करे

अंग भी पूर्ण है


गढ़े जीवन अपना अपना -4
एक बार शरीर के सारे अंगों में विवाद हो गया। पांव कहने कहने लगे ‘हम ही श्रेष्ठ है। हमारे आधार पर ही तो सारा शरीर खड़ा होता है।’ हाथ कहने लगे ‘हम तो सारा काम करते है। हमारे कार्य से ही कमाई होती है। कमाई से पोषण। हम ही सर्वश्रेष्ठ है।’ पेट ने अपना तर्क दिया ‘मैं भोजन ना पचाऊ तो सबकी बैटरी डाऊन हो जाएगी।’ हृदय ने कहा, ‘मैं धड़कना बन्द कर दूं क्या?’ मस्तिष्क कह उठा ‘सब मेरे नियत्रंण से ही संचालित होता है। मैं ही सबका राजा हूं।’ फेफड़ों ने कहा कुछ नहीं एक क्षण रूक गये। श्वास रूकी और सब परेशान। सारे अंग अपनी-अपनी श्रेष्ठता साबित करने में लग गये। कहानी का अंत तो लेखक ने किया आत्मा के विधान द्वारा आत्मा घर छोड़ जाने लगी तो सबकी शक्ति क्षीण हो गई। सब कहने लगे आत्मा ही श्रेष्ठ है क्योंकि इसके बिना तो किसी का कोई अस्तित्व ही नहीं है। किन्तु आत्मा ने कहा ‘आप सभी अपने आप में श्रेष्ठ हो। प्रत्येक अपने अपने कार्य में श्रेष्ठ है। सब अपना कार्य व्यवस्थित करेंगे। तभी शरीर अपना काम कर सकेगा।’ अंगों का कार्य तथा ध्येय पूरे शरीर के अनुरूप होगा तभी उसका महत्व है। शरीर को जहां जाना है पैरों को उसी दिशा में चलना होगा। अन्यथा पैरों का कार्य निरर्थक ही होगा। अंगों की सार्थकता पूरे शरीर के लक्ष्य-पूर्ति में हैं।
अब हम स्वयं को देखें। हमारा अपना एक सर्वश्रेष्ठ भाव है। जैसे पैरों का कार्य हाथ नहीं कर सकते वैसे यदि हम अपने स्वभाव एवं क्षमता के अनुसार जीवन ध्येय चुनेंगे तो सहज सफलता प्राप्त होगी। हमारी क्षमता व रूचि का मेल होता है उसी के अनुसार हमें काम में आनन्द आता है। पूर्व में जो वर्णव्यवस्था थी वह इसी प्रकार गुण-कर्म पर आधारित थी। आज भी यदि हम अपना जीवनध्येय वैज्ञानिक तरीके से तय करना चाहते है तो हमें अपने स्वभाव का वर्ण पहचानना होगा। हमें आनन्द यदि सेवा में आता है तो उसके अनुसार हमें जीवनध्येय चुनना होगा। यदि हमें लाभ प्राप्ति में रस आता है तो हम व्यापारादि उत्पादक कार्यों में अपना जीवनध्येय तय कर सकते है। शारीरिक बल अथवा नेतृत्व में सहजता से रमनेवाले व्यक्ति को रक्षासेवा, प्रशासनिक सेवा अथवा राजनैतिक सेवा का चयन करना उपयोगी होगा। अन्ततः यदि अध्ययन, अनुसंधान या कला संगीत में रूचि हो उसके अनुसार जीवनध्येय बनाने से सहज सफलता मिलेगी।
इस विचार के बाद भी एक बात बच ही जाती है। केवल अपने स्वभाव एवं शक्ति का निर्णय कर लेने से काम नहीं चलेगा। समग्रता से भी विचार करना होगा। जैसे हाथ-पांव आदि हमारे शरीर के अंग है उसी प्रकार हम भी तो राष्ट्रपुरूष के अंग है। भारतमाता के हम अंग है अतः हमारा जीवनध्येय मां भारती के जीवनधर्म के अनुकुल होगा तब ही वह उपयोगी होगा। स्वामी विवेकानन्द कहते है कि भारत का जीवनध्येय (मिशन) है विश्व का मार्गदर्शन करना। हम भारत को विश्वगुरू के पद पर आसीन देखना चाहते है। हमारा जीवनध्येय, कर्म और व्यवसाय चुनते समय हम यदि इस बात का ध्यान रखे तो हमारी सफलता राष्ट्र-सेवा का माध्यम बनेगी और यह भाव कर्म की विशेष प्रेरणा देगा।

एक और बात…
व्यावसायिक लक्ष्य को ही जीवनध्येय न मान बैठे। प्रतिवर्ष लाखों छात्र पीईटी, पीएमटी अथवा आईआईटी की प्रतियोगी परीक्षा में बैठते है। कुछ ही सफल होते है। असफलता छात्र निराशा व हताशा के शिकार हो जाते है। हमने इंजिनियर व डाॅक्टर बनने के व्यावसायिक लक्ष्य को ही जीवनध्येय मान लिया है। व्यवसाय तो साधन है। हमें मुम्बई जाना है। रेल के आरक्षण की लाईन में लगे है। आरक्षण नहीं मिला तो क्या जाना रूक जाएगा? किसी और साधन से चले जाएंगे। हमें अपना ध्येय स्पष्ट होना चाहिए फिर साधन पाने की सफलता अथवा असफलता से निराशा नहीं होगी। डॉक्टर बनना, सीए बनना तो साधन है साध्य अलग-अलग हो सकते है। एक डॉक्टर बनकर सेवा करना चाहता है, दुसरा पैसा कमाना, कोई नया अनुसंधान करना। यदि ध्येय स्पष्ट है तो पी एम टी में असफल रहने पर भी सेवा करने, पैसा कमाने अथवा अनुसंधान करने के वैकल्पिक रास्तों पर विचार किया जा सकता है। दूसरी ओर ध्येय स्पष्ट नहीं हो और केवल भेड़चाल में व्यवसायिक लक्ष्य प्राप्त भी कर लिया तब भी जीवन में संतोष नहीं मिल पाएगा। अतः व्यावसायिक लक्ष्यप्राप्ति पर चिंतन करते समय ही उसके द्वारा प्राप्त करने के जीवनध्येय पर भी ध्यान दें। दोनों स्पष्ट हो जाने पर राह सुगम और आनन्दमय हो जाती है।
एक व्यक्ति ने घर पहूंचकर अपनी पत्नि को कहा, ‘आज मैंने पांच रुपये बचाये।’ ‘कैसे?’ ‘मैं बस के पीछे दौड़ता चला आया।’ पत्नि ने कहा, ‘कल टैक्सी के पीछे दौड़कर आना पच्चीस रुपये बचेंगे।’
साधन का मूल्य सुविधा नहीं, पहुंचना है। क्या बड़े व्यवसाय के पीछे भागकर ज्यादा लाभ मिलेगा? उसी प्रकार एक बार ध्येय, मार्ग और वाहन तीनों का चयन कर लेने के बाद फिर जल्दबाजी या तनाव का क्या काम? रेल गाड़ी में चढ़ जाने के बाद भी यदि कोई अपना सामान सिर पर उठाये रखे तो उसे क्या कहेंगे? या फिर कोई रेल में चढ़ने के बाद भी इंजिन की दिशा में दौड़ता रहे तो क्या जल्दी पहुंच जाएगा?

अक्टूबर 28, 2011 Posted by | आलेख | , , , | 2 टिप्पणियाँ

   

%d bloggers like this: